STORYMIRROR

Sharad Kawathekar

Tragedy

4  

Sharad Kawathekar

Tragedy

ग्रामीण भारत

ग्रामीण भारत

1 min
183

ऋतू बदलले

चैतन्य ओसरले

सगळं सगळं बदलले


गावच गावपण हरवले

झाडाचं हिरवेपण संपलं आणि 

तिथं आलं डांबराचं जंगलपण


गावाबाहेरच्या मंदिरातला भजनाचा स्वर लोपला

आणि तिथं घुमू लागला डीजेचा गोंधळ 


बांधावरची झाडं उलथून पडली 

राहिलेल्या झाडांनाही नकोसे झालंय आपलं हिरवेपण


जिथं तिथं काँग्रेस गवतानी

आपलं साम्राज्य स्थापलंय

वेलीच्या रक्षणासाठी जागोजागी

तारेची कुंपणं आलीत

बांडगुळाची शेती बोकाळू लागलीय


रंगीबेरंगी रंगाचा गर्व असणारी 

रानपाखरं आताशा त्यांचा आश्रय नाकारू लागलीयत

आणि भर म्हणूनच की काय

आभाळान आखडलीय माया

धरती झालीय सुकी

आणि गांधीजींचा ग्रामीण भारत

झालाय क्षीण...


Rate this content
Log in

Similar marathi poem from Tragedy