STORYMIRROR

Rajesh Sabale

Tragedy Others

4  

Rajesh Sabale

Tragedy Others

ग्रामीण भारत

ग्रामीण भारत

1 min
502

हातावर पोट माझं, रोज खांडतोय माती।

चार गाढवाचा धनी, रोज वाहतोय माती।।

दगड फोडीता फोडीता, त्याला देवपण देई।

पोराबाळांच्या पोटासाठी, रोज बडवतोय भुई।।

दगड फोडीचा हा धंदा, लई जोखमीचा हायी।

पोटापाण्यासाठी फिरं तसे, ठाई ठाई पायी।।


पोरं-बाळा नाही शाळा, सारा आडाणी शेजार।

पाटी दप्तराच्या जागी, माती घमेल्याचा भार।।

हाती कुदळ-फावड घेऊन, पोर बांधून पाठीशी।

दिस उगल्यापासून, धनी रोज खेळतो मातीशी।।

असा रोजचा संसार माझा, झाडाच्या बुंध्याशी।

बाई अंघोळीस जाता, मोठा दगड आडोशाशी।।


आमचं मजुरीच जीणं, काय कुणाला सांगावं।

हातावर पोट ज्याचं, त्यांन अंगा काय ल्यावं।।

आमचं नशीब फाटक, कोण लावील ठिगळ।

कष्टकऱ्याचं जीवन, जशी फाटकी कांबळ।।

हातावर पोट ज्याचं, त्यास नाही बसाया झोपडी।

उघड्यावर झाडाखाली, चाले संसाराची गाडी।।


Rate this content
Log in

Similar marathi poem from Tragedy