STORYMIRROR

Shila Ambhure

Inspirational

5.0  

Shila Ambhure

Inspirational

गोवर रूबेला प्रचार गीत

गोवर रूबेला प्रचार गीत

1 min
27.5K


चल गं गाऊ

चल गं साऊ

लसिकरणाला

आपण जाऊ।।धृ।।


गोवर, रूबेला

आहेत आजार

मिळून त्यांना

करू हद्दपार

मोफत लस

शाळेत घेऊ।।1।।


नऊ महीने ते

पंधरा साल

पात्र आहेत

सारेच बाल

वयोमर्यादा ही

लक्षात ठेऊ।।2।।


शेजारचे ते

बंटी, बबली

तिथेच आहेत

चिंटू ,छकुली

आपल्यासवे

त्यांनाही नेऊ।।3।।


सत्तावीस तारीख

नोव्हेम्बरची

सुरुवात असेल

या अभियानाची

दवंडी साऱ्या

गावात देऊ।।4।।


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Inspirational