STORYMIRROR

Dilip Yashwant Jane

Inspirational

4  

Dilip Yashwant Jane

Inspirational

गोडवा

गोडवा

1 min
427

माय मराठीत माझ्या

किती गोडवा भरला

जणू समृद्ध सम्राज्ञी

भासे सारीच आम्हाला


संत पंत तंत काव्य

किती वाड़मय सारे

नव नव विचारांचे

साहित्यात वाहे वारे


ममतेचा तो गोडवा

वाटे माय मराठीत 

नाही दुसरीच कुणी

जागा घेऊच शकत


हर्ष होई रे मनास

माय मराठी बोलून

भाग्यवंत आम्ही सारे

तिज लिहून वाचून


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Inspirational