STORYMIRROR

pooja thube

Abstract

4  

pooja thube

Abstract

गोडपरी

गोडपरी

1 min
346

सोनपरी म्हणू 

की नीलपरी

घरी माझ्या आली 

गोबऱ्या गालांची गोड परी 


चांदण्यांनी सजलेला

सुंदर तिचा झगा

लखलख करती

चांदण्या बघा 


चंद्र तिचा दोस्त

हळूच खुणावे

ताऱ्यांसोबत खेळायला

आम्हाला बोलवे 


परीने सांगितली 

इच्छा मागायला 

खुश मी तुझ्यावर

काय देऊ तुला 


कर सगळ्यांना सुखी

नको डोळा पाणी

सगळीकडे समाधान असावे

मुखी आनंदगाणी


कोणी उपाशी झोपू नये

असावे कपडे अंग झाकायला 

सर्वांनी मिळून राहावे

समृद्ध कर देशाला


परी म्हणाली मला

हे तर सगळे तुम्हीच करू शकता 

एकमेकांचा आदर करा

दुस्वास का करता 


माणूस म्हणून जागा

नको फाजील गोष्टी

अविचारी महत्त्वकांक्षा

ठरेल सगळी खोटी


परीचे म्हणणे 

मला जाम पटले

हे सारे ऐकून 

मी डोळे मिटले


प्रकाशझोताने उघडले डोळे 

परी होत होती अदृश्य

तिच्या चेहऱ्यावर समाधान

दिसत होती ती खूश


हातात माझ्या ठेवली

तिने चांदणी एक

आठवण ठेव माझी

पुन्हा नक्की भेट 


अचानक झाली गडबड 

पडले बेडवरुन खाली

आवाज ऐकून 

आई धावत आली 


होते सारे स्वप्न

सारे उलगडले

अंमलात आणूया

जे परीने सांगितले 


Rate this content
Log in

Similar marathi poem from Abstract