गणपती आले घरा
गणपती आले घरा
पुरुष - आला आला आला
सखे गणपती आला //ध्रु//
स्त्री - घर झाले आनंदित
बाप्पा आले घरात
मोद वसे गं मनात
आनंदी आनंद झाला (१)
पुरुष - विद्या कलांचा आधिपती
कर्ता करविता सुखदाता
अग्रपूजेचा मान मिळे
संकटांचा नाश झाला (३)
स्त्री - गणपती पाठोपाठ
गौराईही येती घरा
महालक्ष्मी पूजन भावे
भोजनाचा थाट झाला (४)
पुरुष - देवापुढे कला सादर
गणेशाचे आशिर्वच
नाच गाणी चाले जोशात
नृत्यताल मनी ठसला (५)
स्त्री - गणपती बाप्पा मोरया
पुढच्या वर्षी लौकर या
गणपती निघाले गावाला
चैन पडेना आम्हांला (६)