गणित जीवनाचे
गणित जीवनाचे


गणित या जीवनाचे,
काळजीने सोडवायचे
माणुसकीचे सूत्र ते,
सदा सोबतीला ठेवायचे....!!
सुखाची बेरीज करून,
करू दुःखाची वजाबाकी
आपुलकीचा गुणाकार,
भागाकारात दाखवू एकी..!!
भाऊबंद, आप्त, सगेसोयरे,
असावा छान मित्र परिवार
सारे मिळून झेलायची संकटे,
ना मायची आयुष्यात हार.....!!
गणित जीवनाचे आपुल्या
जरी वाटते भयानक कोडे
आपुलकीने सोडवूया सारे
आपण रोज थोडे थोडे...!!
सत्याचा पाढा गिरवू,
इमानदारीचे घेऊ सूत्र
लसावी, मसावी आयुष्याची
असे जीवनाचे चित्र...!!
माणसांची मने वाचूया
संस्काराची ठेवू पावती
गणित जीवनाचे छान
सोडवूया अवतीभवती.....!!
मायेच्या या बाजारात
व्याजाला भाव नाही
स्वार्थाला चक्रवाढ व्याज
माणुसकी पोरकी राही......!!
जीवन एक बीजगणित
भौमितिक त्याचे आकार
काळजीपूर्वक सोडवायचे
नाही मानायची कधी हार.....!!