गझल
गझल
गझल..... वीरलक्ष्मी
सांज आता तुझी टाळली
याद येता तरी जाळली....!!
गोड वचने तुझी लाघवी
आज ह्रदयातुनी गाळली...!!
तू उसासू नको हासुनी
वाहणारी जखम वाळली...!!
वाहती आसवे रोखली
जाणुनी प्रीत ही पाळली....!!
जीव माझा असा घाबरा
नेत्र ही भरवुनी वाळली...!!
नजरभर रूप ही पाहणे
छंद मन मारुनी पाळली...!!
श्रीहरी सावळा हा किती
लोक सारे कशी भाळली...!!
