STORYMIRROR

Arun V Deshpande

Inspirational

4  

Arun V Deshpande

Inspirational

गजानना तुमच्याविना

गजानना तुमच्याविना

1 min
28.4K


गोंधळून गेलेल्या या मना

चांगले-वाईट काय कळेना

हे सारे घोळ आता मिटेना

गजानना आता तुमच्या विना ... ।।


मनाला भावेल ते आम्हाला

कसे करून मिळाले पाहिजे

तडजोडी त्यासठी करूनही

डावपेच लढवतो आम्हीच नाना .... ।।


गुरुसेवा घडावी कधी कधी असे

जाणवते हो हे आमच्याही मना

चंचल मन आळशी इतके बेटे

नामी बहाणे सुचती या मना ........।।


डोळे मिटुनी घेतो क्षणभरी

मन फिरुनी येते त्रिभुवनी

स्मरण करण्या तुमचे मात्र

वेळ मुळीच नसतो या मना ........।।


हे सारे घोळ काही केल्या मिटेना

सद्गुरू समर्था आता तुमच्याविना ....।।


Rate this content
Log in

Similar marathi poem from Inspirational