घ्यावेत हो किती
घ्यावेत हो किती
कवी संमेलन
संधी अभिव्यक्ती
भाव भावनांना
मोळळी वाट ती
काही म्हणतात
उगा उठाठेव
नव कवितांना
आलाय तो चेव
किती परीश्रम
करी संयोजक !
कवीच होतात
मग प्रायोजक !!
कधी वाढे वाद
मला नाही संधी
श्रोता दिसभर
ऐकणार कधी ?
मैफिल छोटीशी
असो वा ती मोठी
उडे तारांबळ
कोण आहे पाठी
म्हणू नका यास
खोगीर भरती
हौस करे सदा
घ्यावेत हो किती ?