STORYMIRROR

Manisha Wandhare

Abstract

3  

Manisha Wandhare

Abstract

घरट्यापासुन दूर जाताना

घरट्यापासुन दूर जाताना

1 min
152

फडफडणारी पंख जेव्हा ,

उडण्यासाठी सज्ज असताना,

इवल्या इवल्या पिलांना सोडून,

तुटतो जीव घरट्यापासुन दूर जाताना...

निरभ्र निळ्या आकाशाला,

आपल्या पंखाखाली घेतांना ,

उडता उडता अश्रु वाहते डोळ्यातून,

तुटतो जीव घरट्यापासुन दूर जाताना...

उंबरठ्यावर उभे राहुनी ,

चिवचिव त्यांची ऐकतांना ,

मी रमते मन हरवून ,

तुटतो जीव घरट्यापासुन दूर जाताना...

कधी दाटूनी अचानक आभाळ,

सर पावसाची पंखावर घेतांना,

जड पंखानी घरट्यात परतून,

तुटतो जीव घरट्यापासुन दूर जाताना...

आनंदी आनंद चेहर्‍यावर त्यांच्या,

भुकेल्या पोटी दाना टिपतांना,

जावेच लागेल घरटे सोडून,

जरी,

तुटतो जीव घरट्यापासुन दूर जाताना...



Rate this content
Log in

Similar marathi poem from Abstract