STORYMIRROR

Manisha Awekar

Abstract

3  

Manisha Awekar

Abstract

घरटं

घरटं

1 min
188

मनातलं वादळ , आज कागदावर आलंय

तुमच्या परदेशी जाण्यानं , घरटं सुनंसुनं झालंय


खेळ नि दंगा मस्तीनी , घरटं भरुन गेलं होतं

गप्पागोष्टींनी त्याला , घरपण आलं होतं


आता सगळीकडे , शांत शांत वाटतंय

तुमच्या परदेशी जाण्यानं , घरटं रितं रितं वाटतंय


अभ्यासाच्या काळात , त्याला शांत केले जाई

चिडीचूप बसण्याची , शिक्षा दिली जाई


परीक्षा संपताच , लगेच गजबजायचं

आता वाटतंय , हे घर कधी किलबिलायचं


तुम्हांला परदेशी पाठवताना , हे नव्हतं माहित

आम्हांला रहायचंय , एकाकीपणाच्या खाईत


एकटेपणाने आज , मन खरंच झुरतंय

सडीसारखा सल , मनाला सलतोय


कधी येती पाखरे , मनालाच विचारते

रमणार तर नाहीत ना , झगमगत्या दुनियेमधे


आता वाटतंय , तुम्ही घरकुलात उबेला यावं

तुमच्या मायेच्या पंखात , आमचं मन विसावावं


Rate this content
Log in

Similar marathi poem from Abstract