घर प्रेमाचं
घर प्रेमाचं
आई बाबांबरोबर
घर हसरं असतं
खेळ गप्पागोष्टींसवे
गोड बाल्य फुलतं
माया प्रेमाचा उबारा
घर आपल्याला देतं
संकटात कसोशीने
संरक्षण छत्र देतं
नभ विस्तीर्ण दिसतं
आकाशात पहाताना
झेप घेताच घरटं
दिसे लहान होताना
दूरवर गेल्यावर
कळे किंमत घराची
ओढ मायेच्या बोलांची
घट्ट मिठी जाणिवांची
कुणी पाखरु परते
ओढ लागता घराची
कुणी मात्र तिकडेच
खंत करी घरच्यांची
घर उभंच असतं
सर्वांसाठी कायमचं
माया प्रेमाच्या छायेला
डोईवर धरायचं
