STORYMIRROR

Prashant Shinde

Inspirational

3  

Prashant Shinde

Inspirational

घर कोणाचे...!

घर कोणाचे...!

1 min
386

घर कोणाचे...?


वाद विवाद उफाळून येता

घर कोणाचे कळत नाही

अहंकाराच्या राक्षसाला

अजूनही जीवन काही कळत नाही


चिमुकले जीव आपले

पहात जगतात रेल्वे रूळ

त्यांच्या डोक्यात उगाच शीरते

मी तू चे वेगळे खुळ


समंजसपणाची चावी

म्हणजे असते आपले मुलं

स्लीपरचे काम करून

अखंड पेटती ठेवते आपली चूल


एक जीव एकसंध जीवन

म्हणजे आपले घरकुल

त्यासाठी सदैव चावी असते

गोंडस गोड आपले मुलं....!


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Inspirational