घेई जन्म बीजांकुर...
घेई जन्म बीजांकुर...
घेई जन्म बीजांकुर...
रान फुललं हिरवं
काळ्या मातीत रुजलं
थेंब पडे पावसाचा
अंग अंग शहारलं....
नांगरलं शेत आता
जीव लय हा कष्टाळू
आंजारलं गोंजारलं
काळी आई ही मायाळू....
हिरवळ बहरली
तृण पहा डोकावलं
विठोबाच्या भक्तीमध्ये
मन जसं गुंगावलं...
पावसाच्या मृद्गंधाने
मन गेलं भारावून
झाली तृप्त ही धरणी
वर्षासरी ह्या लेवून....
झालं चहूकडं हिरवं
घेई जन्म बीजांकुर
थुईथुई नाचे पहा
मन होऊन मयुर....
बरसती वर्षासरी
आसमंत आनंदला
पक्षी स्वैर बागडती
शालू हिरवा नेसला...
