घेई घेई माझे वाचे
घेई घेई माझे वाचे
घेई घेई माझे वाचे ।
गोड नाम विठोबाचे ॥१॥
तुम्ही घ्या रे डोळे सुख ।
पहा विठोबाचे मुख ॥२॥
तुम्ही ऐका रे कान ।
माझ्या विठोबाचे गुण ॥३॥
मना तेथे धाव घेई ।
राहे विठोबाचे पायी ॥४॥
रूपी गुंतले लोचन ।
पायी स्थिरावले मन ॥५॥
देहभाव हरपला ।
तुज पाहता विठ्ठला ॥६॥
तुका म्हणे जीवा ।
नको सोडू या केशवा ॥७॥