STORYMIRROR

Manisha Awekar

Abstract

3  

Manisha Awekar

Abstract

घे गगनभरारी

घे गगनभरारी

1 min
159

रांधा वाढा उष्टी काढा

असे जीवन होते तिचे

शिक्षणाने बदलले

विश्व अवघेचि सारे


बुद्धी समान दोघांची

सिद्ध जाहले जगती 

आता निर्णयक्षमता

तिची सरस ठरली


खादा लावून खांद्याला 

उच्चज्ञान मिळवले

घेई बढती यत्नाने

क्षितीजही उंचावले


कला विज्ञान शिक्षण 

सर्व क्षेत्रांत निपुण

घेई गगनभरारी

शब्द कौतुकां अपूर्ण 


पार करावे सखये 

कर्तृत्वाच्या क्षितीजांस

नाव जगी झळकेल

मम नमन कार्यास



साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Abstract