STORYMIRROR

Manisha Awekar

Abstract

3  

Manisha Awekar

Abstract

घड्याळाच्या तालावर

घड्याळाच्या तालावर

1 min
243

दिवसाची सुरवात घड्याळाच्या गजराने,

आला कंटाळा तरीही , लवकर

 उठायचे.  (१)


कच्ची तयारी असली , तरी धावपळ होते

नाश्ता करता करता , कुकरही चढवते    (२)


काँफी चहा बोर्नव्हीटा प्रत्येकाच्या भिन्न वेळा

हसूनच प्रत्येकाला,देता देता जीव गोळा  (३)


भाजी विचारुच नका आवडींचा नसे मेळ

घट्ट पातळ नुमजे, कशी मारावी मी वेळ?   (४)


काटे पळती वेगाने,हाका कितीक माराव्या??

ठणठणपाळ सारे,मेळ कसा मी घालावा?  (५)


धावपळ गडबड,पर्स तशीच घेऊन

गँस मशिन बघून,निघे किल्ल्या उचलून   (६)


सिग्नलला घड्याळाचे,काटे पळती वेगाने

वेग वाढवून पोचे,कचेरीस मी नेमाने   (७)


येता येता बाजाराची,आठवण असे मनी

आतासुद्धा हे घड्याळ,मला का बरे खुणवी?  (८)


घर आणि आँफिसचा,घाली मी यशस्वी मेळ

नवयुग ललनेचा,असा घड्याळाशी खेळ!!  (९)


युगांमागूनीया युगे , जाती नारीची कितीक

तालावर घड्याळाच्या , नारी नाचते अशीच!!  (१०)


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Abstract