घड्याळाच्या काट्यावर चालणारे
घड्याळाच्या काट्यावर चालणारे
घड्याळाच्या काट्यावर चालणारे हे शहर
गर्दीचे, स्वप्न घेऊन आलेल्यांचे
सेकंदाने काटा पुढे गेल्यास
स्वप्न अनेकांचे भंगलेले
तर काहींचे जीवन सुधारलेले...
गर्भ श्रीमंतांचे
गरीबीत गाडलेल्यांचे
भल्या पहाटे
घड्याळाचा काटा
मनात ठरवलेल्या वेळेवर पोहचताच
काबाडकटाचा दिवस सुरु होणार
तर काहींसाठी...
घडाळाचा काटा
कसा पुढे सरकतो
त्या एक एक क्षणाचे
ओझे जन्मभर घेऊन पाठीशी फिरणारा...
