STORYMIRROR

Prashant Kadam

Romance Action

5.0  

Prashant Kadam

Romance Action

घायाळ

घायाळ

1 min
14.4K


दिलखेचक चाल तुझी 

भुरभुरती केस सुरेख

तुडवीत चाललीस हृदये जणू 

पावला पावला गणीक 

मोहक सुंदर रूप तुझे

वर झुळझुळता तलम पोशाख 

रोखल्या नजरा किती तरी

घायाळही झाले लाख

विचलीत तरीही नव्हतीस 

तू रममाण आपल्या धुंदीत

वेग ही बदलू नाही दिलास

चाललीसच होती मस्तीत

इथे तरळली लाखो स्वप्ने

धड धड अनेक हृदयांत

अन् अचानक ठेच लागूनी

पडलीस तू रस्त्यात

हळहळल्या कित्येक नजरा

तरळले अश्रु तयांत

अन् कुठुनसा आला नवरा

ऊठ “हनी हनी “ म्हणत

लाखो नजरा रूष्ट जाहल्या

भानावर आल्या क्षणात

स्वप्नांवर त्यांच्या पडले पाणी

चरफडले फक्त मनांत !


Rate this content
Log in

Similar marathi poem from Romance