गौरव स्त्रीशक्तीचा
गौरव स्त्रीशक्तीचा
नारीशक्ती तूच वंशदायिनी
तुझ्याच उदरी जन्म घेऊनि
लाभले आयुष्य भूलोकावर
हा सौंदर्याचा साज लेऊनि
असुनी स्त्रीगर्भ तू प्रसवलेस
न बाळगली तमा समाजाची
करिते गौरव मी स्त्रीशक्तीचा
घेईन प्रतिज्ञा मी प्रबोधनाची
आहे मी तव कन्या लाडाची
तू माझी वात्सल्यमूर्ती आई
तुझ्या या प्रेमानेच तृप्त झाले
सांग होऊ कशी मी उतराई
झिडकारुनी तें समाजबंधन
ठाकलीस तू समाजविरोधी
नाही घाबरलीस धमकीला
आजी आजोबांच्याही कधी
केले उपकार मजवर आई
देऊन जन्म मला या जगी
विसरणार नाही तुझे ऋण
जपे जीवापाड तुज पोरगी
