STORYMIRROR

Arun Gode

Romance

3  

Arun Gode

Romance

गावठी प्रेम

गावठी प्रेम

1 min
329

तुया डोळला डोळा जेव्हा माया भिडतो,

तेव्हा दोघाचे मन एकामेकाशी जुळते.

हे मले भी आणि तुले भी नाही कळते,

हे कस आणी केव्हा घडते,

फक्त मनातल्या विठोबालेच कळते.


प्रेमाची वीज मनात कशी कडकड्ते.

आपल्या मनाचे ठोके कसे धडधडते,

मग डोळे फाडुन एकामेकाशी भीडते.

हे सगळ कसं कसं घडते,

फक्त मनातल्या विठोबालेच कळते.


एकमेकाच्या भेटीसाठी,

तुहे-माहे डोळे कसे भिरभिरवते.

घराच्या छतावर तुहे-माहे पाय कसे सरसावते,

फक्त मनातल्या विठोबालेच कळते.


प्रेमाच्या ओढ्यात आणी नदीच्या खोऱ्यात,

गावांच्या गावठाण्यात आणि उसाच्या माळ्यात.

तुही न माही भेट कशी घडते,

हे फक्त मनातल्या विठोबालेच कळते.


मनातल्या विठोबा इतका होऊ नको उतावना,

प्रेमासाठी आम्हाले करु नको गाव सुतावना.

हे फक्त मनातल्या विठोबालेच कळते


तुया डोळला डोळा जेव्हा माया भिडते,

तेव्हा मले तुयाशी झोंगा जमल्या सारख वाटते.

खरं काय आणि खोटं काय, हे तुले-मले नाही उमजते,

हे तुह्या-माह्या मनातल्या विठोबाले कळते.


Rate this content
Log in

Similar marathi poem from Romance