STORYMIRROR

anita deshmukh

Romance

3  

anita deshmukh

Romance

दिस पावसाळी

दिस पावसाळी

1 min
243

दिस पावसाळी

धारा अमृताच्या वर्षती l

चैतन्याने बहरे सृष्टी

नदी-नाले खळाळती ll


दिस पावसाळी 

माती गंधाळून जाई l

वेडावला वारा असा

सुगंधल्या दिशा दाही ll


दिस पावसाळी

मन भिजून जाई l

देह हिरवाकंच कसा

बाई होऊन राही ll


दिस पावसाळी

पदर हवेत जाई l

मयूर बनून पाऊले

थुईथुई नाचत राही ll


सरी पावसाळी

कशा ओथंबून येती l

हिरवी तृणांकूरे

गीत नव्हाळीचे गाती ll


Rate this content
Log in

Similar marathi poem from Romance