STORYMIRROR

विजय वैशाली दत्ताराम पराडकर

Romance

3  

विजय वैशाली दत्ताराम पराडकर

Romance

पाऊस...

पाऊस...

1 min
242

कोसळणारा पाऊस मला खूप समजून घेतो

आठवणींचा उजाळा मला याच्याकडूनच मिळतो

"ती" गेली सोडून म्हणून काय झालं ??

मी जेव्हा कोसळतो, तेव्हा हाच माझ्या साथीला असतो...

            पाऊस...!!


सळसळत, कोसळत त्याच्या धारा आल्या

डोळ्यांच्या पापण्या माझ्या, उगाचच ओल्या झाल्या

आठवला त्याच्या निमित्ताने, आपल्या पहिल्या भेटीचा क्षण

मिठीत तुझ्या विसावून, भरले होते माझे मन.....


नभांच्या गडगडाटाने, विजांच्या कडकडटाने

त्याने अगदी थैमान घातले होता...

तोही तसाच, फेसाळलेल्या समुद्रासारखा

माझ्या हृदयाला, माझ्या मनानेच समजून घेत होता...

            पाऊस...!!


मी फक्त, भिजत उभा होतो तुझ्या दारात

पण, कुणा ना दिसले, साचलेले थेंब माझ्या डोळ्यांत

सवयच झाली होती आता, पाऊस आला की,

तुला आठवायचं, नि तुझ्या आठवणीतच आसवांनी भिजायचं...


तुटलो होतो मी, माझ्या मनातून - हृदयापासून

पुन्हा जोडले नाते, तुझे-माझे त्याने आपल्या करामतीतून

"पाऊस" मात्र कोसळतच होता अनाहूतपणे अंबर भरल्यासारखा

ओलावल्या स्पर्शाने नित्य मला साथ देत होता, भडाग्नीसारखा...

               पाऊस...!!


Rate this content
Log in

Similar marathi poem from Romance