STORYMIRROR

Ramkrishna Nagargoje

Romance

3  

Ramkrishna Nagargoje

Romance

पर्यावरणाचे सोबती

पर्यावरणाचे सोबती

1 min
216

झाडी हिरवी पाने हिरवी,

आकाश निळे, ढग काळे पहा.

ही वाहती नदी, तो धबधबा 

पक्षी उडती शुभ्र बगळे पहा. १


डोंगर द-या फूले वनराई,

हरिण ससे उडती उड्डाणे पहा.

पर्यावरण राखती सारे,

मगरीचा जबडा पहा.  २


झेप घेतो व्याघ्र कसा,

ही सिंहाची अयाळ पहा.

रान फूले सुंदर किती,

हा चाफा फूलला पहा.  ३


मध्येच अजगर अनेक श्वापदे

तो डूलता नागराज पहा.

उंच उंच वृक्ष किती,

सजले वन हे पहा    ४


पर्यावरण राखू सारे,

ती अवनी सजली पहा.

गरजेपुरते शोध बरे,

ती दिशा तांबडी पहा.  ५


Rate this content
Log in

Similar marathi poem from Romance