STORYMIRROR

Ramkrishna Nagargoje

Others

3  

Ramkrishna Nagargoje

Others

आई

आई

1 min
200

आई तू जन्म दिला नाहीस नुसता, 

माझ्या जगण्यात श्वास तुझा होता,

जे काही तू दिले ते शब्दात कसे मांडू,

तूझा जीव माझ्यासाठीच कष्ट घेत होता.  १


ओले बाळाते मी नेहमीच केले,

तू कोरडी शय्या नेहमीच दिली,

मी हसलो, कधी खूप रडलो,

तू मज उरी लावून शांत शांत झाली. २.


आई तुच चिऊताई मला दाखवली,

मज अन्नाचा घास तू भरविला,

भूक क्षमविता माझी,

तूझी कंबर नाही थकली.   ३


पहाटेच जाग आई तुला येई,

दिवसाची कामे तू हसत केली,

नाही कधी वैताग तुला आला,

सतत चेहरा पहाता चंद्रकोर हसली.४


काय त्या ईश्वरा सगुण व्हावे वाटले,

म्हणून का त्याने, आई तुझे रुप घेतले,

आई तूझी आठवण आहे जशीतशी,

अदृश्य होऊन तू निर्गूण रुप घेतले ५


Rate this content
Log in