STORYMIRROR

Shrikrishna Talashilkar

Romance

3  

Shrikrishna Talashilkar

Romance

सुखाचा पाऊस

सुखाचा पाऊस

1 min
362

सुखाच्या क्षणांची 

धुंद बरसात व्हावी

तुझी माझी भेट 

ऐन पावसात व्हावी


मृगाची सर अशी 

अलगद यावी

नजरेने नजर तशी 

घायाळ व्हावी


पावसाच्या स्पर्शाने 

धरती मोहरावी

तिच ओढ दोघांच्या 

भेटीत असावी


पावसाने धरणीतून 

अंकुर रुजून यावा

आपल्याही प्रेमाला 

तसा बहर यावा


श्रावणात ऊनपावसाचा 

पाठलाग असावा

सुखाचा शिडकावा 

नित्य दारी असावा


मघा नक्षत्रात पाऊस 

अखंड कोसळावा

आयुष्यात सतत

सुखाचा वर्षाव व्हावा


सुखाचे इंद्रधनुष्य 

दोघांनी विणावे

जीवनाचे सारे रंग 

त्यात मिसळावे


संपूर्ण धरा 

तृप्तीने चिंब न्हावी 

संसाररुपी रोपट्याची 

तशी गत व्हावी


आपल्याही जीवनात अशी 

एक सोनेरी पहाट यावी

तुझी माझी भेट 

ऐन पावसात व्हावी


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Romance