गंधाळलो मी
गंधाळलो मी
गंधाळलो मी
मोगरा ल्यालीस तू
मोहरलो मी
न्हाऊन आलीस तू
रेशमी केसावरी
जलबिंदू साठलेले
माझे मन केव्हाचे
मोहात गोठलेले
साज श्रुंगाराचा
मोह का असावा
मोहक ही काया
आरसाही रुसावा
एका क्षणी वाटतं
नजरेसमोर असावीस
क्षणार्धात वाटतं
परकी का दिसावीस
तुझ्या सोबतचे क्षण
डोळ्यात साठवावेत
सोबतीचे अपुले क्षण
डोळ्यांनी आठवावेत
प्रेमाचा असा वेगळा
ऋतू का असावा
भेटीचा एकेक क्षण
हा सोहळा असावा
होश ना राहिला
बेहोश झालो मी
माझा ना राहिलो
तुझाच झालो मी

