मालवणी कविता (हरवलला बालपन)
मालवणी कविता (हरवलला बालपन)
1 min
297
कदी तरी माका
माझा बालपन गमता
गोठनीरच्या वडाबुडी
सुरपारांबे खेळता
पाठिर दप्तार घेवन
मन शाळेत धावता
सड्यारची करंदा काढताना
झाळीत पाय पडता
चिचे आवळे बोरा तोरा
खावक बरा वाटता
सर्दी खोकलो झाल्यार
आयेचो धबको गावता
व्हाळातसून चलताना
कुरले माशे धरता
गुठ्यार उभ्या रवान
मन मळोभर फिरता
असा वाटता बालपन
बेगीना सरला
मोठा होवच्या नादात
कायतरी हरावला
डोळ्यासमोर माका
सगळा बालपन दिसता
खरा सांगतय निसत्या
आठवनीत मन रमता
