मी आणि छत्री
मी आणि छत्री
तू असतीस सोबत तर,पाऊस निराळा भासला असता.
एका छत्रीत भिजनयाचा आनंद काही औरच असता.
पावसाने तुझ्या वर केली असती धारांची सरबत्ती,
भिजू नये तू म्हणून केली असतीस माझ्याशी अजून सलगी.
तू इतकी समीप असताना ,सांग मी स्वहताला कसे सावरू?
छत्री सांभाळू का तुझे आरस्पानी सौंदर्य निहारु?
पाण्याचे ते थेंब तुझ्या चेहऱ्यावर जणू दवबिंदु मोत्यांचे.
माझ्या सह त्या पावसाला ही वेड लागले तुझ्या प्रेमाचे.
स्वप्न तर माझी खूप आहेत ग,एकदा तरी येऊन जा भन्नाट सरीसारखी.
मी आणि माझी छत्री वाट पाहतो आहे तुझी वेड्यासारखी.

