पाऊस आठवांचा
पाऊस आठवांचा
आठवांच्या जगात तुझ्या
चिंब चिंब व्हावस वाटत
नुसतेच भास येण्याचे तुझ्या
तरीही आज भिजावस वाटत
आभाळ मनाच भरुन येताना
पुन्हा मागे फिरावस वाटत
बेभान झाला ग्रीष्म सखा
तरीही आज भिजावस वाटत
बरसणाऱ्या प्रत्येक थेंबाला
ओंजळीत सामावुन घ्यावस वाटत
आसमंत झाला बरसुनी रिता
तरीही आज भिजावस वाटत
ओढ मातीला स्पर्शाची तुझ्या
दरवळणाऱ्या गंधात न्हावस वाटत
नेहमीसारखाच तू भुलवून जाणार
तरीही आज भिजावस वाटत