STORYMIRROR

Ashwini Chavan

Others

3  

Ashwini Chavan

Others

राहून गेलंय...

राहून गेलंय...

1 min
251

काही बोलायचं राहून गेलंय 

काही सांगायचं राहून गेलंय

उद्याचा विचार करता करता 

जगणं आजचं हरवून गेलंय   


विचारांच्या अथांग जगात     

शब्दांना आज उधाण आलंय     

वाहून जाईल सारं त्यात, म्हणून     

जगणं आजचं हरवून गेलंय 


घ्यायला हवं भावनेला समजून

द्यायला हवं त्यांनाही उमलू

साठवण सारी करता करता 

जगणं आजचं हरवून गेलंय 


जिवंतपणीच करावे जगण्याचे सोहळे  

ऋतू एकांती असाच मावळे  

क्षण बरसत जाता जाता   

जगणं आजचं हरवून गेलंय


साहित्याला गुण द्या
लॉग इन