माझा होशील का
माझा होशील का
1 min
227
अबोल माझी हाक
आतातरी ऐकशील का
खूप थकले धावुनी मी रे
थोडी उसंत घेशील का
कधी समजेन का मी तुला
ठाव मनाचा घेशील का
निशब्द ही प्रित माझी
आर्त हाक देशील का
तुझ्या व्यवहारी जगात
नाही कुठेच शब्दांना वेळ रे
नाही कळले कधीही मला
सारे आकड्यांचे खेळ रे
आहे अजुनही तिथेच मी रे
मागे वळून पाहशील का
संपेल आता जगण्याची आस रे
आता तरी माझा होशील का
