पोहरा
पोहरा
1 min
227
इथे प्रत्येकाच्या मनात
दुःखाचा कोपरा आहे
जगापासून लपविण्या आता
मनाचा सहारा आहे
सभोवताली सारा
आपल्यांचा पसारा आहे
भावशून्य नात्यांचा
जळी निखारा आहे
कवडीमोल बंध सारे
नुसताच उभारा आहे
साचलेल्या जाणिवांचा
मनी ढिगारा आहे
आयुष्याच्या खेळपटाचा
अबोल मोहरा आहे
अव्यक्त भावनांचा हा
रिक्त पोहरा आहे
