लढाई
लढाई
1 min
312
स्त्री जन्माची एक कहाणी
अजूनही लोकहो मुकीच आहे
मुखपृष्ठ वरून सुरेख जरी
दडली कथा रितीच आहे
दडलेल्या त्या आसवांना
पापण्यांतच मी अडवले आहे
ऊब देणारा मायेचा पदर
कुठेतरी मी हरवले आहे
सुखाची शाल पांघरून मनी
अपार दुःख मी झेलते आहे
सबला म्हणविते जरी स्वतःला
दृश्य विदारक सलते आहे
नात्यांच्या मोहात स्वतःला
नेहमीच मी विसरले आहे
अस्तित्व संपवून मी त्वाचे
वाऱ्यासारखी पसरले आहे
एकटी नाही कधीच मी
चित्र सुरेख आकारले आहे
जिंकेपर्यंत लढाई माझी
मनाशी मी हे स्वीकारले आहे
