रंग बरसे
रंग बरसे
1 min
225
उधाण आलेल्या लाटेवर
होण्यास स्वार तरसे
उधळलेल्या रंगात न्हाण्या
मन झाले रंग बरसे
गोकुळी माझा कान्हा
गोपिकांची छेड काढण्या तरसे
प्रेम रंगात त्याची होण्या
मन झाले रंग बरसे
होळीच्या रंगात सारे
जग वेडे होण्या तरसे
विसरुन सारे दुःख जाण्या
मन झाले रंग बरसे
रंग प्रेमाचा,रंग स्नेहाचा
आयुष्य इंद्रधनु होण्या तरसे
एकरूप विश्व होण्या
मन झाले रंग बरसे
