जुने हे वाद सारे
जुने हे वाद सारे


तुझे माझे जुने हे वाद सारे
विसरून जाऊ दोघे सारे...
चूक कोणाची अन् कोणाची नाही
मिटवून टाकू आता दोघे सारे...
समजून घे मला तू
तुझ्यातच माझे विश्व सारे...
गुंफली किती स्वप्न तुझी अन माझी
मिळून पूर्ण करू दोघे सारे...
नात्यातला गोडवा टिकवून ठेवू
पुढे जाऊ आता विसरून सारे...