पाऊस
पाऊस
पाऊसधारा येती घेऊन आठवण त्या गोड क्षणांची
हसती झाडे अन झुडपे होई किलबिल त्या पाखरांची
मोर नाचू लागले कोकीळ ही गाऊ लागला
पाहुनी भरलेल्या ढगांना वारा ही वाहू लागला
थेंबाने तयाच्या हिरवे हिरवे शिवार बहरले
लागताच ही थंड हवा अंग अंग शहारले
पावसाचे थेंब साचले झाडाच्या पानांवर
दिसू लागले मोतीसम पानाच्या कडांवर
कुरणाच्या हिरव्या रंगाला इंद्रधनुची साथ मिळाली
थुईथुई नाचणाऱ्या मोरालाही वाहवाही मिळाली

