गावाचा विकास..
गावाचा विकास..
हवी गावात बंधुभाव,एकता
आहे सांगणे माझं सर्वांस,
सारेच मिळून केल्यावर च
होईल गावाचा खरा विकास.
नाली , रस्ते, पाणी,विज
आहे गावची खास गरज,
साम्राज्य घाणीचं गांवभर
बस्ती रस्त्यावर सोडून लाज,
वापर शौचालाचा करायला
कसं सांगावं कोण कोणास...
चांगले आरोग्य नी शिक्षण
हवी भल्याची साऱ्यांना जाण,
सारे नांदावेत इथे सुखानं
नाव गावाचं होईल महान
या राजाच्या गावाचा खरा
हवा अभिमान सर्वांस....
वाढवू गावाची आपल्या शान
विकास गावाचा मोठा करुन,
हवे सर्वांचे खरे योगदान
गावांसाठी सारेच एकवटून
भेदभाव सारे सोडून धरुया
खऱ्या विकासाची आता कास...
