STORYMIRROR

Samadhan Navale

Inspirational

3  

Samadhan Navale

Inspirational

गाथा स्वातंत्र्यवीरांची

गाथा स्वातंत्र्यवीरांची

1 min
239

आली आज पुन्हा एकदा वेळ त्यांना स्मरण्याची

स्वातंत्र्यासाठी घेतली ज्यांनी,शपथ जगण्या-मरण्याची ||


होते नशीले जीवनच त्यांचे

मार्ग काटेरी अन दु:खाचे,

निर्धार फक्त एकच स्वप्नी, मनी,

करीन मुक्त भारतभूमी

पराधीनतेच्या बेड्यातुनी,

सूर्या पेक्षा लख्ख आहे गाथा स्वातंत्र्यवीरांची

आली आज पुन्हा एकदा वेळ त्यांना स्मरण्याची ||


सांडले कीती रक्त येथे..

कशासाठी ? कुणासाठी ?

गेले किती प्राण येथे..

आहुती स्वातंत्र्ययज्ञासाठी,

पहावा भारत उन्नतीचा

असेल ध्यास त्या वेड्या मनाचा,

पूर्ण करूया स्वप्न त्यांचे, शपथ आम्हाला स्वातंत्र्याची

आली आज पुन्हा एकदा वेळ त्यांना स्मरण्याची ||


या युवांनो करू या शर्थ

स्वातंत्र्याला देऊया अर्थ,

ठेवा जरासा बाजूला स्वार्थ

थांबवा आता हा 'खुनी अनर्थ',

भाग्यविधाते देशाचे आपण

स्वातंत्र्याचे करूया रक्षण,

स्वातंत्र्य असो देशाचे ते..वा,

असो आपले माणूस म्हणून,

त्रस्थ आहे देश आपला,महामारीने भ्रष्टाचाराच्या

करिती आत्महत्या दिवसाढवळ्या..

त्रासून तरुण बेकारीच्या,

लोकसंख्येचा भस्मासुर हा...

आपल्यालाच वाटते करील भस्म,

खडबडून व्हा जागे नि,

रक्षक बना रे देशाचे..

तेव्हाच होईल किमया येथे,क्रांती येईल स्वर्गाची |


आली आज पुन्हा एकदा वेळ त्यांना स्मरण्याची

स्वातंत्र्यासाठी घेतली ज्यांनी शपथ जगण्या-मरण्याची ||


Rate this content
Log in

Similar marathi poem from Inspirational