STORYMIRROR

Rohit Khamkar

Abstract Fantasy Others

3  

Rohit Khamkar

Abstract Fantasy Others

गारवा

गारवा

1 min
306

हल्ली खूप रात्री जाणवतो, दिवसा सुगावा नाई.

पावसामागोमाग त्यालाही, येण्याची होतंच असते घाई.


लहान्यांची गर्दी मोठ्यांची लगबग, मुलायम गालिचा गरम रगेची उब.

सुक्या मेव्याने दिवसाची सुरवात, डिंक लाडवांना चव ती खूब.


सायंकाळी दिवा लाऊनी, स्वयंपाकाची ओढ माऊलीला.

शेकोटीला पेटऊनी असे, खेळ चालू झाला सावलीला.


गारठ्याने त्या गोठून जाई, परिसर सारा चहू बाजूंचा.

पहाट फिरण्या गवता वरुणी, परीस स्पर्श तो दव बिंदूंचा.


नको नकोशी वाटते कधी, झाली की काही व्याधी.

उग्र उन्हाळा तो दारी ऊभा, स्वागत तयारी नाही साधी.


आल्या पावली परतूनी जाई, येण्या पुन्हा त्याच जोमाने.

पुन्हा परिक्रम आठऊण काही, योजना आखू नव्याने.


ऋतूचक्राच्या या प्रवासात, आयुष्य आठवणींनीं सारवा.

उग्र उन्हाच्या संगतीमध्ये, कधीही विसरत नाही हा गारवा.


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Abstract