STORYMIRROR

Kiran Ghatge

Abstract

3  

Kiran Ghatge

Abstract

एल्गार

एल्गार

1 min
251

घोषणा देत जाऊ 

       मोर्चे काढत जाऊ 


न्याय, हक्कासाठी आपण 

       संघटित होत जाऊ 


शोषितांचा आवाज बनून 

     मुठ आपली आवळत जाऊ 


ऐकत नसले कुणी जरी

     आवाज बुलंद करत जाऊ


झाला जरी लाठीमार 

     अंगावर झेलत जाऊ 


धरपकड होईल काही 

     मग गाडीत ओढत जाऊ 


असणार नाही जागा तिथे 

     जेलभरो करत जाऊ


होणार नाही मागण्या मान्य 

     तोवर आपण लढत जाऊ


कितीही लादले गुन्हे कठोर 

     पुन्हा एल्गार करत जाऊ


రచనకు రేటింగ్ ఇవ్వండి
లాగిన్

Similar marathi poem from Abstract