एकटी
एकटी
या घरचे नाजूक रोपटे
त्या घरच्या बागेचे खोपटे
आसरा तो आल्या गेल्याचा
हात तो मनस्वी मदतीचा
गजबजलेल्या नव्या घरात
रुजणार खूप जोमात
बहरणार स्वच्छंदीपणे
नाही राहणार काही उणे
सांभाळली सारी नाती
पेलल्या साऱ्या जबाबदाऱ्या
सारेच आपले समजून
जगली सारी नाती
पण पुरूषप्रधान संस्कृतीत
नेहमीच ती उपेक्षित
हरएक गोष्टीसाठी
होकारच का अपेक्षित ?
महत्त्वाची असूनही
दुय्यम स्थान का तीस?
स्त्री प्रतिष्ठा कायम
पायदळी तुडवली का ती?
असे असूनही
तक्रार ओठी नाही
गर्दीत असूनही
ती सदैव एकटी
