STORYMIRROR

Sonali Butley-bansal

Inspirational

3  

Sonali Butley-bansal

Inspirational

एकतेचा देश

एकतेचा देश

1 min
241

वर्ण, धर्म ,जात या उतरंडीवर उभ्या राहीलेल्या देशात,

वेदोच्चारात मिसळत गेली धम्मोपासना, चर्च मधील प्रार्थना, कुराणपठण, गुरूबाणी, जैन अन पारसी वाणी ...


कधी गुण्यागोविंदाने तर कधी मतभेदातील सुवर्णमध्याने नांदत आहेत गुणीजन ज्ञानीजन अन योगीजन अन् सामान्यजन...


राजेशाही सोडून लोकशाही अंगी बाणवताना संविधानच मानले जाते प्रमाण...

समानता अन् एकसंधपणा राखणे हाच याचा कणा


शिक्षण, नौकरी, व्यवसाय, समाजकारण, राजकारण यात जपली जातेय अनेकातून एकता...


आचार-विचार, खान-पान, सवयी यातील भिन्नता विसरून वेळ आल्यास,

 जपली जाते फक्त माणुसकी ...

जपली जाते फक्त माणुसकी ...


Rate this content
Log in

Similar marathi poem from Inspirational