Prashant Shinde

Inspirational


3  

Prashant Shinde

Inspirational


एकोणतीस मार्च (29)

एकोणतीस मार्च (29)

1 min 337 1 min 337

पाचवा दिवस उगवला एक संयमाचा विचार घेऊन

त्याने ठेवले सर्वांना सीमेपार क्षणात नेऊन...


खायचं प्यायचं ते सारं पुरवून पुरवून

खा थोडं जपून जपून दुसऱ्याला दाखवायचं सोडून खा...


इतरांचेही जीवन मौल्यवान आहे हे ध्यानात घ्या

त्यांनाही आपल्या बरोबर थोडे सुखाचे जीवन जगू द्या...


मलाच पाहिजे सारे याचा आता अट्टाहास जरा दूर राहू द्या

मी माझे माझ्यापुरते सोडून यापुढे तरी सारे सर्वांचे ध्यानीमनी पक्के असू द्या...


प्रत्येक दिवस एक नवे लक्ष्य देतो नकळत आता दक्ष राहा म्हणतो

दूर दूर राहूनच काळजी घ्या म्हणतो संकल्पानेच कोरोनाला मार म्हणतो...


इतकेच सांगावे वाटते आता घराबाहेर अजिबात जाऊ नका

फुकटचा प्रसाद बाबांनो खाऊ नका

लई मारत्यात हे सर्वांना आवर्जून सांगा

पोपटासारखेच निवांत घरी बसा...!


Rate this content
Log in

More marathi poem from Prashant Shinde

Similar marathi poem from Inspirational