एके वेळी जोरात!
एके वेळी जोरात!
एके वेळी जोरात, पाऊस होता पळत,
लोकांना बघितले जात होते पळत,
पण मी नाही गेलो कुठेही पळत,
मी बाहेर थांबलो कारण माझे घर होते गळत.
सकाळ झाली उजाडले, माझे घर ओले झाले होते,
घरात पाणी आले होते, घर खराब झाले होते,
वस्तू खराब झाल्या होत्या, डोक्यात काही सुचत नव्हते,
खाण्यासाठी अन्न नव्हते, पिण्यासाठी पाणी नव्हते.
दुपारपर्यंत घरातून पाणी बाहेर काढले,
संध्याकाळपर्यंत घर साफ केले,
काय करू सुचत नव्हते,
माझे तर ठीक बाकी जण रडवेले झाले होते.
देवाला मी सांगितले होते,खूप जोरात पाऊस पाडरे,
देवाने ते खरच केले,अन माझे नुकसान झाले,
आज यातून मला शिकवण मिळाली,
जास्त लालच संकटात पाडी.
