एक तारा तुटुन आला खाली
एक तारा तुटुन आला खाली
....वाजला भल्या पहाटे
आज घडाळ्याचा गजर
गच्चीवर गेलो मी टाकली
एक आकाशात नजर ...
....तारा एक, तुटुन
येतो होता खाली
म्हणे शोधुया कुणी
सापडेल इथ वाली ...
... जमीनीवर चार
दिवस तरी राहु
कस जगतात माणसं
तसं जगुन पाहु ...
...पण मग परतीची
सर्व मार्ग झाली बंद
राहायच कसे नव्हता
त्याला कसलाच गंध ...
...राग ,लोभ,ईर्षा ,मत्सर कुठे
होत्या त्याला असल्या भावना
असावा शहाणांच्या वस्तीतला
एकमेव हा अडाणी पाव्हणा ...
....मग कळले आपले आकाश
मधील घर होते कधीहि बरे
सुर्य ,चंद्र , सोबतीला होते
कितीतरी छोटिमोठी तारे ...
