STORYMIRROR

Ashok Kulkarni

Romance Others

3  

Ashok Kulkarni

Romance Others

एक प्रेम कविता

एक प्रेम कविता

1 min
347

पाऊस असा रिमझिम 

 अन रंगीन हा मोसम 

 मनातल्या माझ्यागोष्टी

आला आहे तुला सांगण्यासाठी।


उभी बाल्कनीत दिसतसे मजला

न्याहाळी दुरुनी मी तुजला

ते तुझं बाल्कनीतून पहाणं

अन माझं सडकेवर भिजणं।।


पावसाचा ढग दिवाना

मस्तीत असे तो मस्ताना

नाही माहीत कुठे पडायचं

अन कोरडं कुठे ठेवायचं।।


वेड्या पावसाला 

 कोण गुलाब देतो ?

ज्याच्या येण्याने स्वतः

मोसम गुलाबी होतो।।


आता ढगांचा कोण

गडगडात थांबविणार

केस सांभार तुझा पाहुनी

वाटे श्रावण धारा कोसळणार।


धीर थोडा तू धर

ये माझ्याकडे पाऊस थांबल्यावर

तुला कोणी छळतो आहे,

हे मला नाही पटणार


हा पाऊस, हा सुंदर मोसम

अस वाटतय आज

साद घातलीस तू 

 अन बहर प्रेमाला आली आज।।


Rate this content
Log in

Similar marathi poem from Romance