एक कविता लिहावी म्हणते.…
एक कविता लिहावी म्हणते.…
अधीर होऊन वाटं पाहंणार्या,
सावळ्या ढगांच्या चाहुलीने,
स्वच्छंद होऊन बागडंणा द्या नयनांना,
आजं भावनेची फुंकर घालावी म्हणते.
पाऊस प्रेमाची मी ही एक कविता लिहावी म्हणते...
थेंब हातांत झेलून विहरणारया,
कानोसा घेऊन पावसाची रिमझिम ऐकणाऱ्या कानाला,
धुंद लयीशी ओळख करून द्यावी म्हणते
पाऊसप्रेमाची मी ही एक कविता लिहावी म्हणते...
अल्लडं होऊन स्वैर करणार्या,
चिंब सरीतं बेभान भिजणारया देहाला,
काव्याची धुंदीची एक झलक दाखवावी म्हणते,
पाऊस प्रेमाची मी ही एक कविता लिहावी म्हणते...
पावसाच्या सरीसंगे गप्पा मारणाऱ्या,
आठवणींना नव्याने जागवणार्या या बेधुंद मनाची,
शब्दांशी मैत्री घडवून आणावी म्हणते,
पाऊस प्रेमाची मी ही एक कविता लिहावी म्हणते....
पाऊस प्रेमाची मी ही एक कविता लिहावी म्हणते..
पाऊस प्रेमाची मी ही एक कविता लिहावी म्हणते...!

