STORYMIRROR

VINAYAK PATIL

Abstract Others

3  

VINAYAK PATIL

Abstract Others

एक झाड

एक झाड

1 min
271

एक झाड अन् चार फांद्या

असेच काही जगणे असावे

लक्ष विखुरली गवत पाती

तरी कुणाशी नाते नसावे


सदैव आपल्या कक्षेत

अस्तित्व आपले टिकवणे

अन् मुळाशी खोल खोलवर

ज्ञात अज्ञात ओल शोधणे


म्हटले तर छानच असते

हिरवी फांदी हिरवी पाने

अन् कुणाची वाट पाहत

फुलाफुलातून असे बहरणे


दोन दिसांचा ऋतू नंतर

तिची धूळ माती वाहणे

जलकण आशा तहानलेली

सदैव कायम उरात होरपळणे 


एक वादळ पानापानात

सर्वस्वाला व्यापून उरले

अन् विजेची तार लखलख

तया तनमन उत्सुकले  


Rate this content
Log in

Similar marathi poem from Abstract